Monday, September 19, 2016

ऊच्चभ्रूंच्या हाय राईज सोसायट्यामध्ये डेंगुंच्या डासांची निर्मिती जास्त

ऊच्छभ्रूंच्या हाय राईज सोसायट्यामध्ये डेंगुंच्या डासांची निर्मिती जास्त प्रमाणात होत असल्याच आता दिवसेंदिवस आढळत आहे.तसेच बिल्डर्स करत असलेल्या बांधकामात निष्काळजीपणामुळे घाण पाण्याचे साठे,डबकी होत असल्यामुळे डेंगु डासांच्या अळ्या होत असल्याचे निदर्शनात येत आहे.कालच महापालीकेच्या पाच आयएएस अधिकार्याच्या घरात डेंगु डासांच्या अळ्या सापडल्या अशी नावासकट बातमी आहे.
काल डासांच्या नाशासाठी फवारा मारणारा महापालीका कर्मचारी म्हणाला,'साहेब वाळकेश्वरमध्ये बहुतेक सोसायटीमध्ये घराघरात अळ्या आहेत.घरात फेंग शुईची रोपटी लावलीत खाली अळ्या.मनि प्लान्ट लावतात,खाली अळ्या.मनी प्लॅन्ट पैसा येतो म्हणून लावतात आजारी पडतात ४० हजार नंतर हॉस्पीटलमध्ये खर्च करतात?' काय मुर्ख माणसे आहेत ही अस प्रश्नार्थक मुद्रा करून माझ्याकडे बघत होता.
जागतिककरणाचा,खाजगीकरणाचा,'विकासाचा' फायदा सर्वसामान्य लोकांना नाहीच आता याबरोबर नवी रोगराई..
दोष कष्टकर्यांना काम करत नाहीत,झोपडट्टीवाले रोगराई पसरवतात...
तिवराची झाडे पाडणारे व बेकायदा बांधकाम करणारे कपिल सारखे भुक्कड कॉमिडेयन म्हणतात आम्ही टॅक्स भरतो ..
वा भाई वा ..

Friday, January 29, 2016

बृहनमुंबई भाडेकरू परिषदेची 'एल्गार सभा'

या सभेमध्ये लढ्याचा कार्यक्रम ठरवला गेला व पुढील मागण्या मांडण्यात् आल्या..
(1) भाडे नियंत्रण कायदा रद्द कर्ण्याची कारस्थाने बंद करा
(2)चाळीच्या, झोपड्यांच्या पुर्नविकासाठी 70% संमतिची अट कायम ठेवावी.
(3) झोपड्यांवरील प्राॅपर्टी टॅक्स रद्द करावा.
(4) मैदाने, मोकळ्या जागा,खेळाची मैदाने ईत्यादी देखभाल, मेन्टेनन्स, केअरटेकर या विवीध नावखाली खाजगी संस्थाना देण्याची कलमे रद्द् करावीत.
(5) म्हाडा संकुलाचा पुर्नविकास म्हाडातर्फेच करावा
(6) बिल्डर्सना संमति मिळाल्यापासून तीन वर्षात विकासाचे पाऊल ऊचलले नाही तर बिल्डरची NOC रद्द करून म्हाडाने प्राॅपेर्टी AQUIRE करून म्हाडातर्फेच विकास करावा
(7) म्हाडामध्ये ट्रानझिट मध्ये राहात असलेल्या रहिवासांची प्रस्थावित भाडेवाढ 500 रूपयांवरून 3100 रूपयांवर नेण्याचा भाढेवाढ प्रस्ताव रद्द करा.
(8)वरळीगाव व ईतर कोळीवाड्यांना झोपडपट्टी म्हणून घोषित करण्याचे कारस्थान बंद करा
या व ईतर मागण्यासांठी बृहनमुंबई भाडेकरू परिषदेतर्फे मुंबईत किमान 100 सभा घेण्यात येऊन सह्यांची मोहीम करण्यात येईल व फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र विधानभवनावर भव्य मोर्च्या काढण्यात येईल.
(28/01/2016)