Sunday, May 30, 2021

पॅन्डेमिक आवडे भांडवलदारांना',ऊच्चभ्रूंना,सेलिब्रिटीजना'

'पॅन्डेमिक आवडे भांडवलदारांना'
,ऊच्चभ्रूंना,सेलिब्रिटीजना'
चॅरिटीवाल्या अमिताब बच्चननी पॅन्डेमिक
काळात ३१ कोटींचा डुप्लेक्स प्लॅट(लक्झरी अपार्टमेन्ट) खरेदी केला.ईतर सेलिब्रिटी व कॉर्पोरेट ' पर्सनॅलिटीज 'नीही ड्युप्लेक्स (लक्झरी अपार्टमेन्ट) खरेदी याच काळात केली.
कोरोना पॅन्डेमिकचा फायदा कॉर्पोरेट,भांडवलदार व समाजातील ऊच्चभ्रू लोक घेत आहेत.तशी संधीच सरकार त्यांना देत आहे.दुसऱ्या बाजूला श्रमिकांची लूट चालू आहे.
महाराष्ट्र सरकारने बांधकाम क्षेत्रास चालना द्यायचीय सांगून स्टॅम्प ड्यूटी २०२० च्ग्या सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात ५% वरून २% वर आणली.तर जानेवारी ते मार्च २०२१ च्या काळात ३% वर आणली.लगेच ऊच्चभ्रू व कॉर्पोरेट पर्सनॅलिटीजनी फ्लॅट खरेदी चालू केली.त्यात अमिताब बच्चन,ह्रितिक रोशन,डायरेक्टर आनंद राय,सनी लिओन,अलिया भट,स्टॉक ब्रोकर मोतिलाल ओस्वाल,क्रिकेटपटू शेयस अय्यर असी नावे आहेत.त्यात कॉर्पोरेट ' पेर्सनॅलिटीज आहेत.पण आपला लाचार मिडिया 'कॉर्पोरेट पर्सनॅलीटीजची' नावे देत नाही.कारण मिडियाच्या जाहिराती जातील.म्हणून त्यांची सेल्फ सेन्सॉरशिप आहे.ती घोषित अघोषित आणिबाणी असली नसली तरी असतेच.लाचार मिडियाने ही सेल्फ सेन्सॉरशिप कायम स्वीकारलेली आहे.असो तो वेगळा विषय आहे.
बांधकाम क्षेत्रात बांधकाम कामगार येतो.त्याला कोठलेही संरक्षण नाही.गावावरून मजूर आणून त्यांच्याकडून गुलामासारखी कामे करून घेतली जातात.टॉवर बांधताना बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सेफ्टी प्रिकॉशन घेत नाही.विमा संरक्षण नाही.बांधकाम कामगारांसाठी फंड आहे.त्यातून सुद्धा मदत त्याला कोरोना काळात मिळालेली नाही.बांधकाम कामगाराला कोरोना लसीसाठी कोठलेही प्रयत्न सरकारतर्फे केले गेलेले नाहीत.लस न घेता त्यानी काम करावे अशी सरकारची अपेक्षा. सवलती फक्त बिल्डर व कॉर्पोरेट ग्राहकाला.
या तथाकथित सवलती देऊन  मध्यमवर्ग कष्टकरी वर्गासाठी घरे बांधली जात आहेत काय?ऊत्तर नाही हेच आहे.मुंबईत आज १७ हजारावर जुन्या ईमारती आहेत.त्यापैकी १४ हजारावर ईमारती ६० वर्षापेक्षा जुन्या आहेत.या जुन्या चाळीत २०,२५ लाखावर मुंबईकर कष्टकरी कामगार मध्यमवर्गीय मराठी माणसे पिढ्यानपिढ्या राहत आहेत.त्या ऊपकरप्राप्त चाळी पडायला आलेल्या आहेत.त्यांच्यासाठी सरकारचे घरबांधणी धोरण काय.?मुंबईत लाखो लोक झोपडपट्टीत राहतात.त्यांचे काय?पोलिसांनाही घरे नाहीत.कोरोना काळात रोजगारावर परिणाम झाला आहे.घरभाडे,वीजबील बद्दल काय? सार्वजनिजक वाहतूक रेल्वे ऊपलब्ध नसल्यामुळे होणाऱ्या खर्चाचे काय.याबद्दल सरकारी धोरण काय?
सरकार,म्हाडा,सिडकोतर्फेच घरबांधणी झाली पाहिजे.केवळ स्टॅम्प ड्युटी कमी केल्याने लोक घर खरेदी करतील, घरबांधणी मोट्या प्रमाणात होईल व बांधकाम व्यवसायला चालना मिळेल,फ्लॅटच्या किंमती खाली येतील. हे चुकीचे अर्थशास्त्र.ह्यामुळे काय झाले.कॉर्पोरेट पर्सनॅलिटीज,नट नट्या,स्टॉक ब्रोकर,सिलिब्रिटीज ह्यांनी घरे खरेदी केली.ठराविक बड्या बिल्डरची चांदी झाली.
घरबांधणी व्यवसायालाला चालना मिळाली नाही.लाखो मुंबईकर घराच्या प्रतिक्षेत ट्रॅञ्हिट कॅम्प मध्ये राहात आहेत.ज्यांना घराची आवस्यकता नाही असे अमिताब बच्चन सारखे ज्यांचे दुबई,लंडन,सिंगापूर ईत्यादि ठिकाणी लक्झरी ॲपार्टमेन्ट आहेत त्यांनी आणखी मालमत्ता खरेदी केली.
पॅन्डेमिक आवडे ऊच्चभ्रूंना,कॉर्पोरेट भांडवलदारांना,सिलिब्रीटीजना
कॉ.प्रकाश रेड्डी

No comments:

Post a Comment