Sunday, September 13, 2015

शाही स्नान?

शाही स्नान काय क्रूर विनोद आहे? यात शाही काय आणि करतोय कोण? आणि शाहीस्नानाचे लोकशाहीत कौतुक कशाला. या दुष्काळात यांच्या स्नानाचे कौतुक? नागडे, ऊघडे कळकट, मळकट ' साधू' तर काही बदाम खाऊन टणटणीत.तरी त्यांना पंख्याने वारा घालणारे नोकर लागतात.हे 'साधू'.  यांनी आख्खी गोदावरी प्रदुषित केली.त्यांच्या साठी जास्त पाणी सोडता.दुष्काळात शेतकर्यांनी आत्महत्या केल्यातरी चालतील. हे आले कुठून व जाणार कुठे.यांच्यासाठी कोट्यावधी रुपये देऊन सरकार यांचे लांगूनचालन करते.मिडीयाला पण कीती कौतुक....घराघरात बिनडोकपणाचे थेट प्रक्षेपण शिरते.रिमोट आहे म्हणून बरे आहे..
मेन्दुची तर्क करण्याची नसच कापून टाकली पाहीजे...नाहीतर बंड झाले तर जबाबदार कोण..

No comments:

Post a Comment